कुणकेश्वरातील मार्गाचे नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 04, 2024 12:18 PM
views 458  views

देवगड : देवगड मधील कुणकेश्वर मंदिर  मार्गाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेतून या कामासाठी आमदार नितेश राणे यांनी निधी मंजूर करून दिला आहे. कुणकेश्वर येथील वाहन तळाजवळील शौचालय व स्वच्छतागृह यासाठी देखील निधी मंजूर झाला आहे. या कामांची देखील भूमिपूजनेही करण्यात आली आहेत.

हा मार्ग गेले कित्येक वर्ष भाविकांसाठी व्हावा म्हणून तेथील ट्रस्ट व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सतत पाठपुरावा करीत आहे. आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा निधी मंजूर करून आणला आहे. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, कुणकेश्वर चे सरपंच महेश ताम्हणकर माजी सरपंच गोविंद घाडी, बाळ खडपे, प्रकाश राणे, मिठमुबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ  व भाजपा पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.