कुसुर मधलीवाडी रस्त्याचे भूमिपूजन

आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून मिळाला निधी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 20, 2023 18:21 PM
views 165  views

       कुसुर मधलीवाडी ते रामेश्वर दारुबाई मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या नुतनीकरण कामाचे आज शुभारंभ झाला.सरपंच शिल्पा पाटील यांनी श्रीफळ वाढवून कामाचे भुमीपूजन केले.या रस्त्याकरिता आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून १२लाखांचा निधी उपलब्ध झाला.

    कुसुर गावातील अत्यंत महत्त्वाचा असणा-या कुसुर मधलीवाडी -कुंभारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती.या मार्गावरील मधलीवाडी काॅजवे ते रामेश्वर दारुबाई मंदिर पर्यंतचा रस्ता धोकादायक बनला होता.अखेर या मार्गासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधींनी आ.नितेश राणे यांच्याकडे मागणी केली.आ.राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन व डोंगरी विभागातून १२ लाखांचा निधी रस्त्याच्या नुतनीकरणासाठी मंजूर झाला.या कामाचे भुमीपूजन सरपंच शिल्पा पाटील यांनी केले.यावेळी उपसरपंच प्रकाश झगडे, तंटामुक्ती अध्यक्ष सिताराम पाटील,माजी तंटामुक्ती अध्यक्ष दाजी पाटील, सोसायटी संचालक समाधान साळुंखे,माजी ग्रा.प.सदस्य शिवाजी पाटील,दामोदर साळुंखे,प्रकाश साळुंखे आदी उपस्थित होते.