कुणकेरी हरिजनवाडी ते माडखोल तलाव रस्त्याचं भूमिपूजन..!

Edited by: विनायक गावस
Published on: January 28, 2024 13:48 PM
views 75  views

सावंतवाडी : कुणकेरी गावामध्ये गेली २५ वर्षे रखडलेला कुणकेरी हरिजनवाडी ते माडखोल तलाव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (१ कोटी ६७ लाख )  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन  महाराष्ट्र बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँक संचालक महेश सारंग,विधानसभा संपर्क प्रमूख संजू परब वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई , प्रमोद सावंत, संजना सावंत, प्राजक्ता केळुस्कर,शिवाजी परब, दिनेश सारंग, प्रमोद गावडे, सुनिल परब, संदीप हळदणकर, योगेश गवळी, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर,ज्ञानेश्वर परब, रमेश गावडे आदि मोठया प्रमाणात ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.