आ. नाईकांच्या माध्यमातून हिर्लोक - किनळोस, मांडकुली, बावमध्ये विकास कामांचं भूमिपूजन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2024 10:07 AM
views 62  views

कुडाळ : आ. वैभव नाईक यांनी हिर्लोक - किनळोस, मांडकुली आणि बाव या गावांमध्ये मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने शनिवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत  करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. त्यामध्ये  बाव मुख्य रस्ता वेताळ पाणंद ते गाळववाडी रस्ता निधी २९ लाख, बाव भगवती मंदिर ते गाळववाडी पर्यंत स्ट्रीटलाईट बसविणे निधी ३ लाख, बांबुळी म्होळबवाडी ते बाव ब्राम्हणवाडी रस्ता डांबरीकरण करणे निधी ५ लाख.

हिर्लोक मुख्य रस्ता ते लक्ष्मण परब यांच्या घराकडे जाणारा रस्ता, हिर्लोक मुख्य रस्ता ते तळेवाडीकडे जाणारा रस्ता, किनळोस मुख्य रस्ता ते राणेवाडी- सावंतवाडा रस्ता, किनळोस मुख्य रस्ता ते वज्राचापाचा जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.

मांडकुली मुख्य रस्ता ते वरचीवाडी पेडणेकरवाडी स्मशानभूमी जाणारा रस्ता, मांडकुली डांबरेकरवाडी पेडणेकरवाडी रस्ता, मांडकुली ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे या कामांची भूमिपूजने करण्यात आली. यावेळी बाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे,  पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे,सरपंच अनंत आसोलकर, ग्रा. प. सदस्य साक्षी परब,शाखा प्रमुख श्रावण सावंत, रामदास परब,दादा टोपले,प्रशांत परब, दीपक राऊत,संजय गोसावी, कृष्णा पालव,शरद आसोलकर, साक्षी आसोलकर, बाळा परब, शंकर मयेकर,अलका आसोलकर, शोभा आसोलकर, मंजुश्री मांजरेकर,मानसी पालव, मधुकर मांजरेकर,संजय पालव, सुशांत कुबल,राजन चव्हाण, मिलिंद चव्हाण,लक्ष्मण आसोलकर, गुरुनाथ गोसावी आदी बाव ग्रामस्थ उपस्थित होते.

हिर्लोक येथे विभाग प्रमुख नरेंद्र राणे,महिला विभाग संघटक कन्याश्री मेस्त्री,सरपंच प्राची सावंत,ग्रा. प. सदस्य देवयानी कदम,हिर्लोक शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत,उपशाखा प्रमुख निनाद परब,किनळोस शाखा प्रमुख रामू सावंत,उपशाखा प्रमुख दिवाकर बागवे, युवासेना शाखाप्रमुख मंगेश परब,विनोद सावंत,मोहन परब, महादेव टिळवे आदी हिर्लोक ग्रामस्थ उपस्थित होते.

 मांडकुली येथे सरपंच गौतमी कासकर, उपसरपंच तुषार सामंत, ग्रा. प. सदस्य दीपाली चव्हाण, शाखाप्रमुख रघुनाथ खानोलकर, माजी सरपंच तातू मुळीक, संजय येरम, पुरुषोत्तम खवणेकर, गौरी खवणेकर, रिया परब, बाबाजी पेडणेकर, संतोष सामंत, रामचंद्र लाड, अजय खवणेकर आदी मांडकुली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.