
वैभववाडी : पूरहानी योजनेतून मंजूर झालेल्या कुंभवडे कोसमकोंड रस्ता डांबरीकरण कामाचे महिला शाखाप्रमुख सुरेखा चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३१) भूमिपूजन झाले. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत हे काम मंजूर झाले होते. कुंभवडे गावात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध कामांची शुक्रवारी भूमिपूजने झाली. या भूमिपूजनाचा मान महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, माजी सभापती रमेश तावडे, दीपक चव्हाण, वासुदेव चव्हाण, रमेश पाटील, प्रकाश शिंगरे, परशुराम राऊत, शिवाजी फाटक आदी उपस्थित होते.