मिठमुंबरीत सांस्कृतिक भवनाचं भूमीपूजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 24, 2023 19:28 PM
views 118  views

देवगड : मिठमुंबरी येतील प्रसिद्ध श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिराच्या शेजारी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून मिठमुंबरी येथे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली विधानसभा प्रमुख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख व देवस्थान ट्रस्ट चे सचिव गणेश गांवकर, ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग डामरी, मुंबई मंडळाचे सचिव रामदास गांवकर, सुभाष गांवकर, अमित तोडणकर, दीपक तोडणकर, न्यू एनर्जी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निळकंठ गांवकर, लक्ष्मण वाघट, हेमंत तोडणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.