परमे, घोटगे, बोडण इथं BSNL टॉवरचं भूमिपूजन

Edited by:
Published on: November 28, 2023 14:58 PM
views 46  views

दोडामार्ग : तालुक्यातील परमे, घोटगे, बोडण ( शिरंगे पुनर्वसन ) येथील बीएसएनएलच्या टॉवरचे भूमिपूजन शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागात अद्यापही मोबाईल सेवा पोहोचली नसल्याने तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामस्थांची होणारी परवड लक्षात घेता शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी तालुक्यातील परमे, घोटगे व बोडण येथे बीएसएनएल टॉवर मंजूर करून आणले.

या टाॅवरचे नुकतेच उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा संघटक विजय जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, महिला उपजिल्हा संघटिका विनिता घाडी, दोडामार्ग पंचायत समिती माजी सभापती सुनंदा धर्णे, बोडण उपसरपंच संजय गवस, सदस्य प्रशांत गवस यांसह शिवसैनिक व बोडण ग्रामस्थ उपस्थित होते.