
देवगड : देवगड तालुक्यातील टेंबवली बस स्टॉप ते मोंड तर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या रस्त्यासाठी ३ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भूमिपूजन सोहळ्यात माजी आमदार अजित गोगटे, टेंबवली गावचे सरपंच हेमंत राणे, उपसरपंच स्नेहल घाडी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर, प्रकाश राणे, सदा ओगले, सुनील पारकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता भोसले, ओमटेक कंपनीचे समीर पेडणेकर, सुशील लोके, अमित साटम, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, नंदू देसाई, दिलीप कदम, दयानंद पाटील, योगेश पाटकर, तसेच गावचे ग्रामसेवक, ग्राम सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.हा रस्ता तयार झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांसाठी दळणवळण सुलभ होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.