दोडामार्गात भूमिपूजन विकासकामांचं !

Edited by: संदीप देसाई
Published on: December 27, 2023 17:50 PM
views 282  views

दोडामार्ग : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या पणतूर्ली येथील उदय भिवा गवस ते सातेरी मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व दोडामार्ग तालुका भाजपा अध्यक्ष सुधीर दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सैनिक लाडूजी गवस आणि परमे- पणतूर्ली गावचे सरपंच प्रथमेश मणेरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. दिया दीपक गवस, ग्रामपंचायत सदस्य सुनील गवस, यांसह उदय गवस, जगन्नाथ गवस, सौरभ गवस, सौ. वृंदा गवस, काशिनाथ राऊळ, माजी सरपंच हनुमंत गवस, विलास गवस, कंत्राटदार अनिल गवस, खानयाळे सरपंच हरिश्चंद्र नाईक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या हा रस्ता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि सरपंच प्रथमेश मणेरिकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आलेचे सांगण्यात आले.