सावंतवाडी रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचं राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन !

केसरकर समर्थक शिवसैनिकांनी फिरवली पाठ ?
Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 16:20 PM
views 646  views

सावंतवाडी : रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे ऑनलाईन उपस्थित होते. तर आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली हे रेल्वे स्थानकांमध्ये उपस्थित होते. दरम्यान, सावंतवाडी स्थानकाच रेल्वेस्थानक सुशोभीकरणाच राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आल. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे समर्थक शिवसैनिक अनुपस्थित राहिल्यानं या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवल्याच्या चर्चेंच वादळ  राजकीय गोटात उठलं आहे. 


सावंतवाडी रेल्वे स्थानकाच सुशोभीकरण तसेच रस्ते कॉंक्रिटीकरण व अन्य कामांचे भूमिपूजन माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, निरवडे सरपंच सुहानी गावडे, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, खरेदी-विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, माजी जि प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी जि प सभापती गुरुनाथ पेडणेकर, सौ. शर्वाणी गावकर, माजी सभापती मानसी धुरी, पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, आनंद नेवगी, प्रसन्ना कुबल, बांदा सरपंच प्रतीक्षा नाईक, उपसरपंच जावेद खतीब, भाजपचे पदाधिकारी सुधीर दळवी, शेखर गांवकर, संतोष गावडे, मळगावचे माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर, शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, परिक्षित मांजरेकर,  तुकाराम बर्डे, केतन आजगावकर, संदीप बांदेकर, अमोल पावसकर,उदय जामदार, उदय सावळ, गुरुनाथ गावकर, मेघना साळगावकर, वंदना मडगावकर, आनंद पांढरे, शासकीय ठेकेदार रोहित नाडकर्णी, भाऊ कांबळी, अजित सातार्डेकर, सहदेव सामंत, शाम सांगेलकर यांसह भाजपचे तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रेल्वे स्थानक अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, फुटपाथ, आर सी सी गटर, संरक्षक भिंत, प्रवेश द्वार कमान, बस थांबा, रिक्षा थांबा, बागकाम व इतर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ६ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी यातील जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा यावेळी राजन तेली यांनी व्यक्त केली. तसेच या कामामुळे देश-विदेशातील जिल्ह्यात येणारे पर्यटक तसेच चाकरमानी यांच्यासह स्थानिक प्रवासी तसेच रिक्षा चालक-मालक यांनाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे तेली यांनी त्यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे त्यांनी विशेष आभार मानले. 


केसरकर समर्थक शिवसैनिकांनी फिरवली पाठ ?

सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेना नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका करण्याची एकही संधी भाजपचे माजी आमदार राजन तेली सोडत नाही. मळगाव रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच आज त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्यात आल. त्यामुळे केसरकर समर्थक शिवसैनिकांनी या कार्यक्रमाचे पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, उपतालुकाप्रमुख देवा कांबळी हे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. परंतु, भुमिपूजनाच्या फोटोसेशनवेळी फ्रेममधून ते बाजूला होते. तर सावंतवाडी तालुक्यातील जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडीचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांसह दोडामार्गचे  शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी दिसून न आल्यानं राजकीय गोटात चर्चांना उधाण आल आहे.