कोचऱ्यात उद्या सुमारे ४ कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने !

मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: March 09, 2024 14:04 PM
views 120  views

वेंगुर्ला :  वेंगुर्ला तालुक्यातील कोचरे येथील सुमारे ४ कोटींच्या विविध विकासकामांची भूमिपूजन सोहळा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्या १० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे. 


   सुमारे १ कोटी रुपये किमतीच्या राज्यशासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर कोचरा श्री गुरुदेवदत्त मंदिर परिसर व दत्तमंदिर जेटी परिसर पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण करणे व अनुशांघिक कामे करणे, सुमारे १ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी मार्च २०२३ अंतर्गत कुडाळ-पिंगुळी-म्हापण-कोचरे श्रीरामवाडी बंदर रस्ता रा.मा. १८३ किमी १७/०० ते १९/०० मध्ये श्री भावई मंदिरशेजारी संरक्षक भिंत बांधणे तर सुमारे १ कोटी ५५ लाख रुपये किमतीच्या राज्यशासनाच्या कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत मौजे कोचरा भटवाडी येथील चौधरी यांच्या घराच्या ठिकाणी दरड प्रतिबंधक संरक्षक उपाययोजना करणे या विकास कामांची भूमिपूजन उद्या मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार आहेत. तर या  सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोचरा सरपंच योगेश तेली यांनी केले आहे.