तळेकर मंदिराचा विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2026 12:21 PM
views 24  views

सावंतवाडी : तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि सामाजिक कार्यात विशालजी परब यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याने, ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशाल परब यांच्या हस्ते विधीवत पूजा करून मंदिराची पायाभरणी करण्यात आली.

याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना विशाल परब यांनी मंदिराच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या आणि गावाच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. स्थानिक ग्रामस्थांनी विशालजींच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक कार्याला एक वेगळी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमाला तळेवाडीतील ग्रामस्थांसह  पदाधिकारी सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा बँक सदस्य रवी मडगांवकर, सैनिक बँक अध्यक्ष बाबूराव कविटकर, बाबा राऊळ, दीपक पुंडलिक राऊळ, आनंद राऊळ, संजय राऊळ, शंकर राऊळ, दत्ताराम राऊळ, दीपक महादेव राऊळ, वासुदेव राऊळ, चंद्रकांत राऊळ, राजेंद्र राऊळ, भगवान राणे, मोहन राऊळ, मनीष राऊळ, पल्लवी राणे, दिलीप राऊळ, स्वप्निल राऊळ, सुहास राऊळ, अंतोन रोड्रिक्स, रवीकमल सावंत, केतन आजगावकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, तरुण वर्ग आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.