
देवगड : देवगड वाडा येथील अ . कृ.केळकर हायस्कूल येथे नीता निळकंठ दीक्षित या बालोद्याना चा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मंदार जोशी यांनी पूजन केल्यानंतर या बालोद्यानचे पूजन देवगड एज्युकेशन बोर्डाचे मुख्य चिटणीस शंकर धुरी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, वाडा स्थानीय समितीचे अध्यक्ष शांताराम पुजारे, शाळा समितीचे सदस्य हर्षद जोशी, वाडा हायस्कूलचा शिक्षक व शिक्षकेतर वृंद, वाडा प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील घस्ती तसेच विद्यार्थी उपस्थित होते. निरंजन दीक्षित यांच्या दातृत्वातून हे बालोद्यान आकार घेणार आहे. दीक्षित फाउंडेशन अलीकडे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवीत आहेत .