
देवगड : कुवळे -रेंबवली येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन संदीप साटम, अमित साटम, राजेंद्र शेट्ये, अशोक तर्फे यांच्या हस्ते पार पडली.कुवळे -रेंबवली मुख्य रस्ता खडीकरण -डांबरीकरण करणे ,मुख्य रस्ता ते गणपती साना रस्ता डांबरीकरन करणे ,मुरारी सावंत ते महालक्ष्मी मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, कुवळे बौद्धवाडी येथील साकव लोकार्पण करणे अश्या अनेक कामांची भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आली .यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सुभाष नार्वेकर ,सरपंच सुभाष कदम ,सुहास राणे ,सारिका म्हनयार ,सुभाष थोरबोले ,रत्नदीप कुवळेकर ,सुनील वळंजू ,अजित घाडी ,राजेश राणे ,सुनील कोकम ,गणपत कोकम ,मारुती कोकम ,जग्गनाथ वळंजू ,सत्यवान वळंजू ,गणेश पवार ,संतोष राणे ,संकेत तर्फे ,प्रकाश तर्फे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .जलद आणि मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले तसेच आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.