
सावंतवाडी : गुरूपौणिमेच्या निमित्ताने शनिवारी शालेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील प्रती शिर्डीच्या मंदिरातील साई पालखीचे आगमन झाले होते. पादुकांपुजनानंतर रविवारी सकाळी श्रींची पालखी माडखोलच्या दिशेने रवाना झाली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर स्वतः पालखीचे भोई बनले होते. पायी चालत ते पालखीसह रवाना झाले.
मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे माखडोल येथील साईंची पालखी दाखल झाली होती. गुरुपौर्णिमेला केसरकरांनी साईंच्या पादुकांची विधीवत पुजा केली. शनिवारी सायंकाळी पाद्यपूजा करण्यात आली. रविवारी सकाळी श्रींची पालखी माडखोलच्या दिशेने रवाना झाली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे यामध्ये पायी चालत सहभागी झाले. यावेळी सुधीर धुमे, अशोक दळवी, नंदू शिरोडकर, जोसेफ आल्मेडा आदींसह साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.