
कणकवली : शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या बालेकिल्यात सुरंग लावण्याचे काम भारतीय जनता पार्टी कडून सुरू करण्यात आले आहे.भिरवंडे - गांधीनगर सरपंच मंगेश अनंत बोभाटे,ग्रामपंचायत सदस्य सुनीता अनाजी सावंत,सदस्य मंजुषा महादेव बोभाटे, सदस्य प्रसन्ना प्रशांत सावंत,शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थतीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो,आवाज कुणाचा भारतीय जनता पार्टीचा...!, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशी जोरदार घोषणाबाजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली यावेळी प्रवेश करताना चे स्वागत पुष्पगुच्छ देऊन आमदार नितेश राणे यांनी केले.
मी मूळ नारायण राणे यांचा कट्टर कार्यकर्ता होतो गेल्या दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत गेलो मात्र आमच्या गावांमध्ये कोणती कोणतीही विकास कामे झालेली नाहीत गावचा विकास होत नसेल तर त्या ठिकाणी न थांबता मी पुन्हा आमदार नीती सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे अशी प्रतिक्रिया प्रवेश गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे यांनी दिली.
यावेळी भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संदीप मेस्त्री,समीर प्रभू गावकर, राजू पेडणेकर,संदीप सावंत,श्यामसुंदर दळवी ,स्वप्नील चिंदरकर,रमेश सावंत, विजय सावंत, संतोष सावंत ,आनंद घाडी,सुभाष मालांडकर आदिंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.