भिमशक्तीच्यावतीने भिमा कोरेगावच्या शौर्यातील शूरवीरांना मानवंदना

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2024 17:10 PM
views 77  views

सावंतवाडी : भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भिमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्य दिननानिमित्त शुरविरांना सावंतवाडीत मानवंदना देण्यात आली. सावंतवाडीत समाजमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भिमा कोरेगावच्या शोर्यातील शूरवीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भीमशक्तीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, नामदेव धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी, नीलिमा चलवादी, सौ भारती पवार, सुप्रिया धारगळकर, शांताराम कासले, दीपक जाधव, मोरेश्वर जाधव, शशिकांत नेमळेकर, नारायण जाधव, नयना जाधव, शुभांगी जाधव, संजना जाधव, द्रौपदी जाधव, कल्पना जाधव, माधवी जाधव, भागीरथी जाधव, दीपाली जाधव, संतोष जाधव, अशोक जाधव,  राजन कासले, किरण कांबळे, दीपा जाधव, कांचन जाधव, गणेश उर्फ राज जाधव, अनुसया जाधव आदी उपस्थित होते.

      

यावेळी भिमशक्तीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर यांनी भिमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक इतिहासाची जाणीव ठेवणे ही आज काळाची गरज असल्याचे सांगितले. तर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी भिमा कोरेगावच्या शौर्यदिनाचा आज खरा इतिहास बहुजन जनतेसमोर येण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमात समाजातील शांताराम जाधव, शशी नेमळेकर आदीं विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किसन पवार यांनी केले.