
सावंतवाडी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी शहरात भीम गर्जना रॅली काढण्यात आली. यातील चित्ररथ खास लक्षवेधी ठरले. मोठ्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी या रॅलीत सहभागी झाले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त शहरातून ही यात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्याने त्यांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार राज्यकारभार करण्याची प्रेरणा मिळते व त्यांच्या विचारावर चालण्याची एक नवी ऊर्जा मला मिळते असं मत मान्यवरांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, बोलो रे बोलो जय भीम बोलो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीतील चित्ररथ खास लक्षवेधी ठरले. युवकांसह मोठ्या संख्येने महिला वर्ग या रॅलीत सहभागी झाला होता.