कुणकेरीत भवानी मातेचा गोंधळ

महेश सावंतांनी घेतलं दर्शन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2025 16:44 PM
views 183  views

सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरी येथे श्री देवी भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाला शुक्रवारी मुंबई माहीमचे आमदार तथा वेंगुर्लेचे सुपुत्र महेश सावंत यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

कुणकेरी येथे सावंत कुटुंबीयांच्या श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यामध्ये आमदार महेश सावंत यांनी सहभाग घेतला.यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ तालुकाप्रमुख मायकल डिसोजा,उपतालुकाप्रमुख संदीप माळकर, शिवदत्त घोगळे, शैलेश टिळवे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांनीही देवीचे दर्शन घेतले आणि उत्सवात सहभागी झाले.