शिक्षक समितीच्या अधिवेशनाला भाऊसाहेब चासकर यांचं व्याख्यान

Edited by:
Published on: January 05, 2024 14:50 PM
views 80  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग व तालुकाशाखा कुडाळचे संयुक्त १८ वे त्रैवार्षिक महाअधीवेशन रविवार दि. ७ जानेवारीला सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात मराठा समाज हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आले असून, या अधिवेशनला कार्यक्रम अध्यक्ष जिल्हाध्यक्ष नारायण नाईक असणार आहेत. तर उद्घाटक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे असणार आहेत, राज्य शिक्षकनेते उदय शिंदे व राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी दिली आहे. प्रसिध्द व्याख्याते भाऊसाहेब चासकर हे प्रमुख वक्ते अधिवेशनात सरकारी शाळांसमोरील आव्हाने  आणि पालक व शिक्षकांची भूमिका या विषयावर अहमदनगरचे प्रसिध्द व्याख्याते  तथा समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क बचाव कृती समिती भाऊसाहेब चासकर यांचे प्रमुख मार्गदर्शन शिक्षकांना होणार आहे.

अधिवेशनात राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य शिक्षकनेते उदय शिंदे , राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर ,प्रमुख वक्ते भाऊसाहेब चासकर, विद्यमान जिल्हाध्यक्ष नारायण नाईक,जिल्हासरचिटणीस सचिन मदने , तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सचिव महेश कुंभार आदींचे विशेष सत्कार होणार आहेत. शिक्षक समिती आयोजित इ.5 वी शिष्यवृत्ती सराव परिक्षा 2023 मधील जिल्हास्तरीय टाॅप टेन गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक विलास सरनाईक, संतोष नेरकर, सौ श्रध्दा वाळके,रामचंद्र कुबल , आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक सौ शामल मांजरेकर, दिपक गोसावी, दिपक डवर यांचे विशेष सत्कार करण्यात येणार आहेत.

शिक्षक समिती वेंगुर्ला शाखेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अधिवेशनमध्ये करण्यात येणार आहे. अधिवेशनात प्राथमिक शिक्षक व शाळांबाबतचे विविध प्रलंबित मागण्यांचे ठराव पारित केले यामध्ये प्राथमिक शाळा मधील सर्व रिक्तपदे भरण्यात यावीत ,ऑनलाईन कामे करण्यासाठी शाळाना इंटरनेटसह सर्व आवश्यक सुविधा पुरवाव्यात.शाळाना आवश्यक स्टेशनरी पुरवावी ,शिक्षकांचा 100% वेळ अध्यन- अध्यापनसाठी खर्च अशी व्यवस्था निर्माण करावी, शिक्षकाना आणि सेवानिवृत्त शिक्षकांना 1तारीखलाच वेतन प्रदान करावे ,प्राथमिक शिक्षकाना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नि:शुल्क देण्यात यावे ,1993 नंतर सेवेत दाखल झालेल्या निवडश्रेणी पात्र शिक्षकांची यादी थयार करुन ती मंजूर करावी , प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत ,मान.आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय शिक्षकाना कामगिरीवर नियुक्त करु नये ,नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणार्या शिक्षकाचे पेन्शन प्रस्ताव सहा महिने मंजूरीसाठी पाठवून, संबंधित शिक्षकाना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या लगतच्या महिन्यात प्रदान करावेत , कार्यालयीन कामे करण्यासाठी प्रशासकीय कार्यरितीनुसार पुरेसा वेळ द्यावा,दोन वर्षापुर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाना गटविमा परतावा रक्कम ताबडतोब प्रदान करावी, 2005 पुर्वीच्या डी.सी.पी.एस्.धारकांची कपात केलेल्या रक्कमा त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा कराव्यात. ,आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची सेवा-पुस्तके सर्व नोंदी करुन ज्या त्या पंचायथ समिती कार्यालयात पाठविण्यात यावीत*,शिक्षकांच्या रजा मंजूरीची नोंद सेवा-पुस्तकात करुन रज मंजरीचे लेखी आदेश देण्यात यावेत,12-शिक्षण हा विषय सेवा हमी कायद्यात 2023 पासून समाविष्ट करण्यात आला आहे म्हणजे शिक्षकिना या कायदा व नियमाचे भरीव प्रशिक्षण देण्यात यावे आदींचा समावेश असणार आहे.

 नूतन कार्यकारिणी जाहिर होणार

सन 2024-2027 साठी शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखा व कुडाळ तालुकाशाखा नूतन कार्यकारिणी अधिवेशनमध्ये जाहिर केली जाणार आहे. कुडाळ महिला आघाडीकडून ईशस्तवन व स्वागतगीत सादर होणार तर सूत्रसंचालन एकनाथ सावंत व सौ सानिका मदने करणार आहेत. या त्रैवार्षिक महाअधिवेशनला सिंधुदुर्ग जिल्हयातील तमाम शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने , कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग व सचिव महेश कुंभार यांनी केले आहे.