भटवाडी जि. प. शाळा नं. ६ मध्ये मुलांना गणवेश वाटप...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 04, 2023 12:53 PM
views 254  views

सावंतवाडी : कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं. 6 भटवाडी सावंतवाडी या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानामार्फत मुलांना मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या की, मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या व शाळेचे नाव मोठे करा व आपलं भवितव्य उज्वल करा व मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी  शाळेच्या अध्यक्षा श्रीम अनिशा राणे, शिक्षणतज्ञ दिलीप भालेकर, शाळेचा मुख्याध्यापिका का. सायली लांबर, सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. सायली लांबर यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम यांनी मानले.