भास्कर जाधवांविरोधात भाजप आक्रमक !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 07, 2024 08:10 AM
views 568  views

देवगड : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसंपर्क अभियानांतर्गत कणकवली येथील जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निषेध करत निदर्शन करण्यात आले आहे.

दरम्यान देवगड कॉलेज रोड येथे जाहीर निषेध करत भास्कर जाधव यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. घोषणाबाजी करत कॉलेज नाका परिसर दुमदुमून सोडला होता.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बाळा खडपे, प्रकाश राणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगरसेवक शरद ठुकरूल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, युवा शहराध्यक्ष दयानंद रामाने, माजी नगराध्यक्ष प्रियंका साळस्कर, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर, तन्वी शिंदे, मकरंद जोशी, अजित राणे, संदीप नाईक धुरे, संजय लाड, उत्तम बिर्जे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.