राष्ट्रीय स्तरावरील दि प्राईड ऑफ इंडिया : भास्कर अ‍ॅवॉर्ड कोकणसाद LIVE चे संपादक सागर चव्हाण यांना जाहीर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी गोव्यात पुरस्कार वितरण समारंभ
Edited by: ब्युरो
Published on: May 25, 2023 15:32 PM
views 100  views

पणजी : महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ इंडिया ः भास्कर अ‍ॅवॉर्ड-2023 कोकणसाद LIVE चे संपादक सागर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. 


गोवा येथील टेक्नोक्रॅट व पर्यावरण लेखापरिक्षक जीवन जवारे, सांस्कृतिक क्षेत्रातील समाजसेवीका सौ.जयश्रीताई जाधव, गोवा येथील अमृतमहोत्सवी रियल ग्रुप ऑफ कंपनी, उत्तर प्रदेशचे खासदार संगमलाल गुप्ता, कोल्हापूर जिल्यातील प्रसिध्द उद्योजक प्रकाश मोहीते, अहमदनगरचे प्रसिध्द उद्योजक दापत्य स्वप्नील भूजबळ व सौ.पूजा भूजबळ यांचे सह गोवा आणि महाराष्ट्र येथील पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सागर दत्ताराम चव्हाण संपादक दै.कोकणसाद, महेश रामगोंडा पाटील-उपसंपादक दै.लोकमत, विजय लाडू मलीक विशेष प्रतिनिधी दै.तरूण भारत, विजय डीसुझा उपसंपादक दै.टाईस ऑफ इंडिया, यशवंत बाबू पाटील सहायक वृत्त संपादक दै.गोमन्तक,  तर साखळी गोवा येथील सामाजिक क्षेत्रातील गुरूप्रसाद (संजय) गणपत नाईक, उमेश पांडूरंग सरनाईक आदी मान्यवरांचा यंदाच्या नामांकनामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. अशी माहीती संस्थाध्यक्ष डॉ.राजीव लोहार यांनी दिली.


रविवार दि.28 मे 2023 रोजी, रविंद्र भवन, साखळी-गोवा येथे सकाळी 09 ते दुपारी 1 या वेळेत सदरील शानदार समारंभ सपन्न होत आहे. समारंभाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, पदमश्री विनायक खेडेकर उपस्थित राहाणार असून प्रमुख अथिती गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.डॉ.प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन, जल परिवहन, बंदर विकास राज्यमंत्री मा.श्रीपाद नाईक, गोवा माजी मुख्यमंत्रीे मा.दिगंबर कामत, यांच्या सह माजी केंद्रीय कायदामंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, गोवा कामगार नेते अ‍ॅड. अजितसिंह राणे, गोवा राज्य पत्रकार संघ (गुज) चे अध्यक्ष राजतिलक नाईक, पत्रकार अनिल पाटील, महिला विभागाच्या अध्यक्षा सौ.मनिषा लोहार आदि मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.


 प्रथम सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्यभर गाजत असलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. पुण्याचे प्रसिध्द तबला वादक विनोद सुतार व संतोष साळवे हे तबला जुगलबंदी सादर करतील, तर लोकसंस्कृतिचे जतन करून परंपरा जतन करणारे व नवया पिढीला वारसा देणारे सुरेश शंकर वाजंत्री-पांगीरे व सहकारी जि.कोल्हापूर हे सनई-चौघडी वादन करणार आहेत.


व्दितीय सत्रामध्ये दिपप्रज्वलन, प्रतिमापुजन तसेच भास्कर विशेषांक 2023 चे प्रकाशनही होणार आहे. समारंभाचे सुत्रसंचालन प्रसिध्द वृत्त निवेदिका, पत्रकार राधिका सातोस्कर-कामत या करणार आहेत. पुरस्काराचे यंदाचे 18 वे वर्ष आहे. समारंभासाठी प्रवेश विनामुल्य असून सदरील समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण youtube- bhaskar bhushan live / BBLMARATHI तसेच  www.bbnewslive.in या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. त्यामुळे देश- विदेशातील नागरीकांना या समारंभात सहभागी होता येईल. प्रारंभी महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने मागील दहा वर्षामध्ये राज्यातील विविध भागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर मेळावे, शिबीरे, चर्चासत्रे यामध्ये सहभागी होवून मार्गदर्शन करून सामाजिक सेवेचा उपक्रमास सहकार्य दिले बध्दल, सौ.सविता कुंभार-सांगली, मातोश्री हॉस्पिटल-कोल्हापूर, प्रशांत मोरे-पाचगणी, डॉ.विवेक लोळगे-ठाणे, अमित कदम-इस्लामपूर, डॉ.जी.एम.सुतार-किर्लोस्करवाडी-सांगली, सौ.प्रज्ञा पितळे-मुंबई यांचा स्मृतीचिन्ह भेट देवून सत्कार करण्यात येईल.


 सन 2023 चे अन्य पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे- ग्रामविकास क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व सौ.प्रियांका संतोष जाधव-पेरनोली आजरा, वाळवा तालुका एज्यूकेशन सोसा.चे सचिव अ‍ॅड.धैर्यशील बाळासाहेब पाटील-इस्लामपूर -सांगली, वरद हॉस्पिटल देहू-पुणे चे संचालक डॉ.नवनाथ अरूण शेळके, जयसिंगपूर-कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका डॉ.आशाताई सुरेश गाडीवडार, दत्तसेवा पतपेडीचे विकास अधिकारी बाबुराब ज. पाटील,विटा जि.सांगली येथील शैक्षणिक क्षेत्रातील आदर्शवत प्रा.संजय जगनाथ साठे, कोल्हापूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील अलौकीक कार्य डॉ.संग्राम बाळासो शिंदे, रोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक महेंद्रभाई रमेश गुजर, पुणे जिल्हयातील हिवरे येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्शवत डॉ.प्रवीण तुकाराम शिंदे, हडपसर पुणे च्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशा अशोक झरेकर, शिरोली औद्योगिक क्षेत्रातील यशस्वी उद्योजक शिवाजी शामराव शिसाळ,वाकड पुणे च्या उद्योजिका निशा बिरडा, गोणशेत-मावळ जि.पुणे ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच अंकुश दासाहेब खरमारे, बांदा-सिंधुदुर्ग येथील दै.सकाळचे बातमिदार निलेश तुकाराम मोरजकर,प्रशासकीय सेवेतील आदर्शवत साहायक निबंधक सौ.रंजना बारहाते-इस्लामपूर, पुण्याचे उद्योजक सागर प्रकाश फुलफगर, गव्हरमेंन्ट इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर अभिजित दिलीपराव माने-शिरोळ, मिरा-भाईंदर कुस्ती संघाचे सरचिटणीस पै.वसंतराव यशवंत पाटील, आदर्श मागदर्शक श्रीनिवास जग्गनाथ माळगे-शिरोळ जि.कोल्हापूर, महाबळेश्वर/पाचगणीचे प्रसिध्द उद्योजक प्रवीण गेणदेव गोळे,सातारा जिहयातील धामणेर गावचे आदर्श कृषी भूषण सौरभ विनयकुमार कोकीळ, सातारा पोलिस सेवेतील आदर्श कु.तेजल विलास कदम, शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श सौ.नवनिता अरविंद पटेल-दुदुस्कर, पर्वरीम-गोवा येथील साहसवीर, शौर्य भूषण कु.गुंजन पंकज प्रभू नार्वेकर, बारामतीचे शैक्षणिक क्षेत्रातील आदर्शवत डॉ.नेताजी नवनाथ कराळे, तामिळनाडू ऑल जर्नालिस्ट युनियनचे सचिव डॉ.डी रितेश जैन बी ए, गणेशाप्पा आर-बेंगलोर-कर्नाटक, बीचोलीम गोवा येथील क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील आदर्शवत अ‍ॅड. अजिक्यसेन कान्होजीराव राणे-सरदेसाई, सातारा न्यूज चॅनेलचे संपादक प्रकाश गणपत शिंदे, गोवा येथील प्रसिध्द वृत्त निवेदिका राधिका सातोस्कर-कामत आदी मांन्यवरांना भास्कर अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे.