भारतीय समाजरत्न अँड. शिवाजी देसाई यांचे रविवारी शिवचरित्रावर व्याख्यान

आयनोडे पुनर्वसन झरे 1 इथं रामनवमी उत्सवानिमित्त आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: April 01, 2023 08:40 AM
views 250  views

दोडामार्ग : भारतीय समाजरत्न पुरस्कार विजेते, गोव्यातील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते अँड.  शिवाजी देसाई यांचे  दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे पुनर्वसन झरे १ या ठिकाणी श्री रामनवमी उत्सवानिम्मित रविवार दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे.


अँड शिवाजी देसाई मूळ ब्रम्हा करमळी, सत्तरी गोवा ह्या गावातील आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता: बी.एस्सी. बी. जे. (बॅचलर इन जर्नलिझम.) एल.एल.बी अशी आहे तर पेशाने ते वकील आहेत. वर्ष २००३ पासून गोवा आणि महाराष्ट्रात  ते स्वतंत्रपणे वकिली करत आहेत. वर्ष २००० मध्ये शासकीय महाविद्यालय साखळी येथे शिक्षण घेत असताना राष्ट्रीय स्तरावरील मॉक संसदीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून संपूर्ण भारतात तिसरा येण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.


आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आणि गुन्हे परिषदेतर्फे मानव अधिकार आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर सन २०२३ च्या राष्ट्र गौरव पुरस्काराने ते सन्मानित आहेत. ग्लोबल फाऊंडेशन पुणे तर्फे भूषण पुरस्कार ह्या मानांकनात सन २०२२ चा डायनॅमिक पर्सनॅलिटी ऑफ द इअर हा पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सामजिक क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्राप्त झाला आहे.


गरुड झेप अँकॅडमी, पुणे कडून व्याख्यानाच्या माध्यमातून समाज जागृती केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनव शिक्षक भारत पुरस्कार त्यांना २०१७ साली प्राप्त झाला आहे. गोवा सरकारने वर्ष २०१९ मध्ये गोव्यातील सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान केला होता. ग्लोबल फाऊंडेशन पुणेचा सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदानाबद्दल सन २०२३ चा भारतीय समाज रत्न हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांच्या हस्ते त्यांना मिळाला आहे.


सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल काणकोण आमोणा येथे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल महामहीम राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते विशेष गौरवाने ते सन्मानित आहेत.सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे ते समन्वयक.आहेत या समितीच्या माध्यमातून गेली चौदा वर्षे नाणूस किल्ला ही चळवळ राबवून प्रतिवर्षी ह्या किल्यावर क्रांतिवीर दिपाजी राणे यांना गार्ड ऑफ ऑर्नेर देण्यासाठी निर्णय घेण्यास त्यांनी गोवा सरकारला भाग पाडले आहे.गोवा मराठी अकादमी, सत्तरी प्रभागाचे उपाध्यक्ष.गोवा आरटीआय फोरमचे संस्थापक सदस्य आहेत. 


मराठी संस्कार केंद्राचे संयोजक, ब्रम्हकरमळीअश्या विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. विविध सामाजिक-सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आणि कायदेविषयक विषयांवर अश्या एकूण सत्तर विषयांवर २००० हून अधिक व्याख्याने आणि भाषणे त्यांनी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात दिलेली आहेत शिवाजी महाराज, मराठ्यांचा संबंधित विविध विषयांवर व्याख्याने ,आरटीआयविषयी जनजागृतीसह गोव्यातील विविध कायदेशीर साक्षरता शिबिरांमध्ये भाग घेतला आणि त्यांचे  यशस्वी आयोजन केले आहे. 

गोव्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये युवकांशी संबंधित अनेक प्रश्नांवर तरुणांसाठी विविध परस्पर सत्रांचे आयोजन, सत्तरी तालुक्यात तृतीय आरटीआय ग्रामीण गोवा अधिवेशनचे आयोजन असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. विविध सामाजिक-सांस्कृतिक विषयांमध्ये सहभाग आणि चळवळीची उभारणी, विविध वर्तमानपत्रांमधील विविध सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय मुद्द्यांवरील लिखाण प्रसिद्ध झाले आहे. म्हादई आणि विशेष मुलांशी संबंधित विषयांवर पथनाट्य लेखन आणि दिग्दर्शिन या करीता ते प्रसिद्ध आहेत. त्यांची कविता लेखनासाठी देखील विशेष ओळख आहे.


गोव्यातील अनेक सामाजिक आंदोलनात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. गोव्यातील सत्तरी तालुक्यात गाजलेल्या मेलावली आय आयटी विरोधी आंदोलनात त्यांची निर्णायक भूमिका होती. ते इतिहास अभ्यासक देखील आहेत.