
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयातील भूवैज्ञानिक भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे सह सचिव लक्ष्मीकांत ढोके यांच्या सहिचा आदेश आज निर्गमित झाला आहे.
यापूर्वी रत्नागिरी येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी भा. नं. जोशी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी या पदाचा कार्यभार 21 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन आदेशान्वये सोपविण्यात आला होता.