
वैभववाडी : वैभववाडी राष्ट्रीय कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी भालचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे.गेल्या अनेक वर्षापासुन श्री.जाधव हे कॉग्रेसमध्ये सक्रीय आहेत. कॉग्रेसचे प्रांतध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार प्रांताचे उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी श्री.जाधव यांना निवडीचे पत्र दिले आहे.
जाधव हे गेली अनेक वर्ष कॉग्रेसचे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांनी युवक अध्यक्षपदी अनेक वर्ष काम केले आहे.कॉग्रेसच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानतंर देखील ते पक्षातच कायम राहीले.जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी विविध आंदोलने,उपोषणे केली आहेत.अखेर त्यांची तालुकाध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली.या निवडीनंतर श्री जाधव म्हणाले, पक्षनेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.तसेच पक्ष संघटना मजबूत करुन तळागाळात पक्षाचे धोरण पोहचविण्यासाठी काम करणार आहे.तसेच सर्वांच्या साथीने पक्षाला गत वैभव मिळवून देणारं आहे.