भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी

Edited by:
Published on: January 19, 2025 16:31 PM
views 668  views

कणकवली : भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय यांची जाहीर रित्या माफी मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर, सदस्य दीपक मडवी, राजा पडवळ , विजय सुतार आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फोंडाघाट परिसरातील वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजनी बुवा विनोद चव्हाण यांना फोंडाघाट येथील राधाकृष्ण मंदिरात या वक्तव्याचा जाब विचारला.त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी जाहीर माफी मागितले आहे.

ह. भ. प. या शब्दांची खिल्ली उडवून अश्लील पद्धतीने कीर्तनकारांवर केलेली टीका त्यांना फारच महागात पडली. वारकरी संप्रदायाने या त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत निषेध केला होता. माफी न मागितल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी माफी मागून आपण अशी पुन्हा चूक करणार नसल्याचे मान्य केले आहे.