भजन सम्राट चंद्रकांत कदम यांचे स्मारक सौर दिव्यांनी उजळणार...!

Edited by:
Published on: September 12, 2023 18:48 PM
views 315  views

कणकवली : सुप्रसिध्द भजनकार भजन सम्राट चंद्रकांत कदम यांचे आरे फाटा देवगड येथील स्मारक सौर दिव्यांनी उजळणार आहे. समाज सेवक गणेश ज. कदम व बुवा अमित तानवडे यांनी यासाठी खास प्रयत्न केले आहेत. 

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोकण कलाभुषण सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांनी लोककलेतील डबलबारी भजनाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या स्मृतिंचे कायम स्वरूपी जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातील त्यांचे शिष्य तसेच गुरुदास परिवारातील सदस्यानी आरे फाटा येथे त्यांचे स्मारक उभारले आहे. राज्यभरात अनेक संतांची स्मारके आहेत, पण अध्यात्माचा प्रबोधन तसेच भजनाची सांगड घालून प्रसार करणाऱ्या भजनी बुवांचे स्मारक कुठेही नाही. भजनाच्या माध्यमातून अध्यात्माची आवड़ निर्माण करणाऱ्या या भजन सम्राटांची पुढील पिढीला ओळख व्हावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी कोकण कलाभुषण चंद्रकांत कदम यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी आरे फाटा येथे गुरुदास चौकाच्या रूपाने  उभारले आहे.

आत्ता या स्मारकाला  ओसरगाव कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र समाजसेवक गणेश जगन्नाथ कदम व बुवा अमित तानवडे यांच्या सौजन्याने तसेच  बुवा गोपीनाथ बागवे, बुवा भगवान लोकरे, बुवा रामदास कासले, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा विजय परब, बुवा लक्ष्मण गुरव, बुवा भालचंद्र केळुसकर, बुवा प्रमोद  हर्याण, बुवा गणेश पांचाळ, बुवा प्रमोद धुरी, बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष कानडे* यांच्या सहयोगाने या स्मारकाला विविध प्रकारच्या दहा सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारे सौर दीप लाऊन रात्रीच्या वेळी हे स्मारक प्रकाशमान करण्यात येणार आहे.