रासाई कला क्रीडा मंडळाला संदीप गावडे यांच्याकडून भजन साहित्य

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2024 13:07 PM
views 277  views

सावंतवाडी : सावंतवाडी जिमखाना येथील रासाई कला क्रीडा मंडळाला भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्याकडून भजन साहित्य भेट देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नितेश पाटील, खजिनदार अंकुश लाखे, कार्याध्यक्ष रोहित लाखे, भाजपा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर, गेळे सरपंच सागर ढोकरे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्याकडून नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या मंडळाला ही भेट म्हणून दिली आहे. त्यांच्या या भेटीबद्दल मंडळाकडून त्यांचे आभार मानण्यात आले.