
सावंतवाडी : कोलगाव ग्रामस्थांच्यावतीने नुकतीच कोलगाव येथील श्रीदेवी सातेरी मंदिर निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले. यावेळी व्यासपीठावर भजना विषयी बोलताना सर्वात सोपा आणि ईश्वर भक्तीचा सहज मार्ग म्हणजे भजन असे उद्गार काढले. भजन स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हाभरातील अनेक नामांकित अशा प्रकारचे मंडळ या ठिकाणी सादरीकरण करतील. क्रमांका पेक्षा सादरीकरणाला महत्त्व द्या अशा प्रकारचा सल्ला पोलीस निरीक्षक यांनी भजनी बुवा सह मंडळांना दिला.
यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक शेख गुरूजी यांनी संत साहित्यातुन संतांची भुमिका नेमकी काय याचे विवेचन करत माणुसकी हा धर्म हिच भुमिका संतांनी मांडली आणि हिच भुमिका घेऊन आपण सगळ्यांनी समाजाला भजनातुन संत विचार देण्याचे महान कार्य आपण भजनी बुवा आणि भजन मंडळे करतात हे खरंच अभिमानास्पद आहे असं मत व्यक्त केले. यावेळी उद्योजक शैलेश पै, सुनील नाईक, शहाजान शेख गुरुजी, बुवा मोहन मेस्त्री, विनायक ठाकूर, सुरेश राऊत, लक्ष्मण सावंत, नंदू कदम , बुवा अनिल पांचाळ यासह परिक्षक बुवा मोहन मेस्त्री अन्य मान्यवर उपस्थित होते
पहिल्या दिवशी भजन स्पर्धेत सिंधुदुर्गातील नामांकित पाच संघाने आपले दर्जेदार सादरीकरण करत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत अनेक नामांकित भजनी बुवा ही हजेरी लावली निमंत्रिताच्या या स्पर्धेला रसिकांचा हि अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. सातेरी देवस्थान चे अध्यक्ष चंदन धुरी प्रकाश धुरी अनिल धुरी सदाशिव धुरी अशोक धुरी रमेश धुरी विरेंद्र धुरी मेघश्याम काजरेकर राजन म्हापसेकर समिर धुरी नंदा धुरी संजीव धुरी आनंद धुरी मुलीधर धुरी संजय पाटणकर अण्णा कावले नागेश धुरी गणपत चेंदवणकर आदि उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी केल.