लोकनेते भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्याचं अनावरण

१०१ व्या जयंतीचं निमित्त ; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2025 11:05 AM
views 423  views

सावंतवाडी : लोकनेते नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त या अनावरण सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.   

माजगाव येथे 'प्रेरणा' सभास्थळी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या माध्यमातून या सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. भाईसाहेब सावंत यांच्या भगीनी कुसुम बिल्ये यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी शालेय शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार बाळाराम पाटील, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव माजी प्राचार्य व्ही.बी‌. नाईक, खजिनदार सी.‌एल.नाईक,  अमोल सावंत, विक्रांत सावंत, रामदासशेठ निळख, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी प्राचार्य व्ही बी नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अनावरणानंतर उपस्थित मान्यवरांनी भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. १०१ व्या जयंतीनिमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद सावंत, संदिप राणे, काका मांजरेकर, प्रेमानंद देसाई,अँड. शामराव सावंत, अँड. नुकल पार्सेकर, चंद्रकांत सावंत, आत्माराम गांवकर, डॉ. प्रविण कुमार ठाकरे, गितेश पोकळे, सोनाली सावंत, अँड. रेवती राणे, जगदीश धोंड, संप्रवी कशाळीकर, सुगंधा साटम, गुलाबराव चव्हाण, नागेश मोर्ये, मानसिंग पाटील, बयाजी शेळके, झाकीर हुर्ले, प्रसाद बांदेकर, विभावरी सुकी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, संजय लाड, सागर नाणोसकर, आदींसह शिक्षण प्रसारक मंडळ, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनावरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी केल.