
देवगड : देवगड मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल व स्व.विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे वार्षिक स्नेहसंमेलन, व पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम संस्था कार्याध्यक्ष नारायण सखाराम आडकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून.या वेळी सकाळ पासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे.
सकाळी ९.३० वा. रांगोळी चित्रकला हस्तकला प्रदर्शन उद्घाटन, १० वाजता बक्षीस वितरण समारंभ, ११.३० वा. अल्पोपहार आणि सायंकाळी ५.३० ते ८.०० विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था व प्रशालेच्या वतीने शाळा करण्यात आले आहे.










