दोडामार्ग युवासेना तालुकाप्रमुखपदी भगवान गवस

Edited by: संदीप देसाई
Published on: April 14, 2024 11:45 AM
views 215  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका युवासेना तालुकाप्रमुख पदी मणेरी येथील भगवान चंद्रकांत गवस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच सावंतवाडी येथे प्रदान करण्यात आले आहे. या पत्रावर सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद किशोर डेरे यांची सही आहे. 

दिलेल्या नियुक्ती पत्रात असे म्हटले की, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेशजी सरनाईक यांच्या विनंतीनुसार व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आशिर्वादाने शिवसेना पक्षांच्या युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील युवासेना तालुकाप्रमुख या पदावर भगवान चंद्रकांत गवस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस उपस्थित होते. दोडामार्ग शहरात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी श्री. गवस यांनी स्पष्ट केले. शिवाय गवस यांनी याआधीही युवासेना तालुकाप्रमुख पदावर चांगले काम केले आहे. परत एकदा त्यांच्यावरच पक्षाने ही जबाबदारी सोपविली आहे.