LIVE UPDATES

Ratnagiri News : गणपतीपुळे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाला प्रारंभ

विविध कार्यक्रमांचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 15:30 PM
views 25  views
Bhadrapadi Ganeshotsav Begins at Shree Ganpatipule Mandir, Ratnagiri

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र संस्थान श्री देव गणपतीपुळे येथे भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून कार्यक्रमांना प्रारंभ झाला. १५ सप्टेंबरपर्यंत श्रींच्या मंदिरात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत श्रींची महापूजा, प्रसाद असा कार्यक्रम झाला.

उद्या सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सहस्र मोदक समर्पण कार्यक्रम होईल. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत सामुदायिक आरती व मंत्रपुष्प व त्यानंतर ७.३० ते ९.३० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार हभप लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी सुश्राव्य कीर्तने सादर करणार आहेत.

श्रींची पालखी मिरवणूक १४ सप्टेंबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येईल. २३ सप्टेंबरला वामन द्वादशीच्या दिवशी दुपारी ११.३० ते २ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गणपतीपुळे देवस्थानात उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन देवस्थान पंचकमिटीचे सरपंच निलेश कोल्हटकर यांनी केले आहे.