सणासुदीच्या दिवसात घरोघरी फिरणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांपासून सावध रहा : सुधीर राऊळ

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 14:44 PM
views 131  views

सावंतवाडी : कोकणात सध्या जोरदार गणेश चतुर्थीची लगबग चालू आहे. त्यात काय विपरीत घटना घडू नये यासाठी या परप्रांतीय व्यापाऱ्यांपासून सावध रहा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुधीर राऊळ यांनी केल आहे.

हे मोटरसायकल वरून खुर्च्या सारख्या भरपुर प्रमाण असलेले सामान मोटरसायकलवर ठेऊन फिरतात त्यामुळे ट्राफिकचा मोठ्या प्रमाणात विषय होतो. यातून काय विपरीत घटना घडण्याच्या आत पोलिसांनी या व्यापाऱ्यांना रोखा हे बांगलादेशी रोहींगे पण असू शकतात. पोलीस स्टेशनला यांची नोंद पण ठेवणे आवश्यक आहे.हे गावात संशयास्पद फिरतात काय विपरीत घटना घडल्यास मनसेकडून या व्यापाऱ्यांना चांगला चोप देण्यात येईल.घरोघरी फिरणारे हे व्यापारी एकच वस्तू घेऊन गृपने गावातील सगळी घर फिरून व्यापार करण्याचा प्रयत्न करतात लहान मुले पण त्याच्या बरोबर वस्तू घेऊन फिरतात त्यामुळे गावातील स्थानिक व्यापाऱ्यांना आणि जागृक लोकांना याचा नाहक त्रास होतो.