शर्मिला केळुसकर यांना 'बेस्ट लीडरशिप' गोल्ड मेडल

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 04, 2024 06:46 AM
views 301  views

कणकवली : येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिका, एनसीसी केअर टेकर ऑफिसर शर्मिला मिलिंद केळुस्कर यांनी ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी ग्वाल्हेर या संस्थेमध्ये दोन महिन्यांचे असोसिएट एनसीसी ऑफिसर (एएनओ) हे प्रशिक्षण पूर्ण करून बेस्ट लिडरशिपसाठीचे गोल्ड मेडल मिळविले आहे. त्यामुळे समस्त सिंधुदुर्ग वासियांना अभिमान वाटत आहे. केळुसकर यांनी 'या' प्रशिक्षणात एक्सलंट इन योगा, एक्सलंट इन ड्रील, एक्सलंट इन पायलट ड्रील हा बहुमानही पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी ग्वाल्हेरच्या माध्यमातून एससीसी महिला प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शर्मिला केळुस्कर या सहभागी झाल्या होत्या. ३१ जानेवारी २०२४ ते ३० मार्च २०२४ असे दोन महिन्यांचे हे प्रशिक्षण होते. या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना बेसिक सैनिक प्रशिक्षण, व्यक्तीमत्व विकास, मार्गदर्शन कौशल्य, खेळ, योगा, संरक्षण यादृष्टीने महत्वपुर्ण प्रशिक्षण देण्यात आले. देशातील विविध राज्यातील सुमारे १०६ महिला प्रशिक्षक यात सहभागी झाल्या होत्या. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर संस्थेच्या माध्यमातून बेस्ट अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना सन्मान बहाल करण्यात येतो. यात शर्मिला मिलिंद केळुस्कर यांना लिडरशिप गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच त्यांनी एक्सलंट इन योगा, एक्सलंट इन ड्रील व एक्सलंट इन पायलट ड्रील हा बहुमानही मिळविला. ब्रिगेडीअर जितेंद्र शर्मा यांच्याहस्ते त्यांना हा बहुमान देत सन्मानित करण्यात आले. तसेच आतापर्यंत सदर प्रशिक्षण संस्थेत झालेल्या दहा प्रशिक्षण कार्यक्रमात बेस्ट लिडरशीपसाठीच्या यादीत महाराष्ट्राचे नाव शर्मिला केळुस्कर यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच बोर्डवर झळकले आहे.

श्रीमती केळुस्कर यांनी यापूर्वीही पतंजलीच्या राज्य पातळीवरील योगास्पर्धा परीक्षेत पहिला नंबर तसेच आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. त्यांच्या या यशाबद्दल संस्था तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या ठिकाणी जे काही ज्ञान मिळाले आहे, ते ग्रामीण भागातील एससीसीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे केळुस्कर यांनी सांगितले.