सिंधुदुर्गनगरी : पुणे बिझनेस स्कूलमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुंभारवाडी जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन कृषीशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत 'कृषीशास्त्र' हँडबुक विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले, ज्यामध्ये शेतीविषयक विविध विषयांवर माहिती समाविष्ट आहे.
5 जानेवारी २०२६ रोजी कुंभारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पुणे बिझनेस स्कूलमध्ये व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कु. कुणाल कुंभार, कु. कुणाल वंजारे, कु. भुषण कदम यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला.शाळेच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश नसल्याने पुणे बिझनेस स्कूलमार्फत तयार करण्यात आलेले ‘कृषिशास्त्र’ नावाचे हँडबुक शाळेला भेट देण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शेतीतल्या विविध तंत्रज्ञानाची, पिकांची लागवड, माती परीक्षण, सेंद्रिय शेती, आणि शेतकऱ्यांच्या जीवनशैलीबद्दल सखोल माहिती देणे हा होता.
यावेळी मुख्याध्यापक अनिल पारकर सर, श्री.तेरसे यांची उपस्थिती होती. बिझनेस स्कूलचे सागर लोखंडे सर, संचालक गणेश राव, प्राचार्य मीनाक्षी त्यागी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.










