देवगड तळवडे ग्रामपंचायतीत आवास योजनेत लाभार्थी उपेक्षित

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 17, 2023 19:06 PM
views 128  views

देवगड : देवगड येथील तळवडे ही ग्रामपंचायत सांसद आदर्श ग्रामपंचायत योजनेअंतर्गत समाविष्ट असून देखील या ग्रामपंचायतीला अद्याप सर्व केंद्रीय योजनांमध्ये प्राधान्य मिळाले नाही आहे. आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत उद्दिष्ट प्राप्त नसल्यानेच या ग्रामपंचायतीला काही लाभ हे लाभार्थ्यांना देता आलेले नाही आहेत.

देवगड मध्ये इतर काही ग्रामपंचायतींना हे उद्दिष्ट प्राप्त असून त्यांना हा लाभ मिळत आहे. परंतु देवगड येथील तळवडे या ग्रामपंचायत करता हे आवास योजना उद्दिष्ट प्राप्त नसल्यानेच लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून हा लाभ देता येत नाही आहे.

लाभार्थ्यांमध्ये ग्रामपंचायत तळवडे मध्ये प्रतीक्षा यादीतील लाभार्थी दिनकर सखाराम झाजम यांच मोदी आवास योजने अंतर्गत 2020 - 21 पासून यांची नावे लाभार्थी यादीमध्ये असून देखील यांना या योजनांचा लाभ देता आलेला नाही आहे. तसेच तसेच सुधा जयवंत धुपकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2020 - 21 पासून त्यांची नावे या यादीत समाविष्ट असून यांना हा लाभ तळवडे ग्रामपंचायत कडून देता आलेला नाही आहे. यासाठी सदर तळवडे या ग्रामपंचायतीला हे उद्दिष्ट प्राप्त होऊन शासनाने लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे.