
सावंतवाडी : आयुष्याच्या एका टप्प्यावर आलेल्या अंधत्वाचा धैर्याने सामना करत झेप घेणाऱ्या मुंबई 'आकाशवाणीच्या 'आरजे' अनघा मोडक यांच्या 'जगण्याचे गाणे होताना' प्रेरणादायी व्याख्यान बुधवार ११ जानेवारीला सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मोती तलावाकाठी शिवउद्यान, सावंतवाडी येथे आयोजित केले आहे.
'साहस प्रतिष्ठान' सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी यांच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती, जिजामाता जयंती व युवक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन वेंगुर्ले तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार हनुमंत (अण्णा) देसाई असून प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर तसेच जनशिक्षण संस्था अध्यक्षा अलका रेडकर - नारकर, समता महिला मंडळाच्या तेजश्री मळगावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार अरुण मेस्त्री आदि उपस्थित राहणार आहेत.
आबालवृद्ध व युवकांसाठी शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य महत्वाचे आहे. मनातील नैराश्य दूर होऊन सकारात्मकता वाढेल, असे प्रेरणादायी व्याख्यान ऐकण्यास उपस्थित राहण्याचे आवाहन दिव्यांग विकास केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली पाटील व सचिव एन. जी. देसाई, उपाध्यक्ष श्रीलेखा दामले, सखाराम नाईक, खजिनदार सतीश भांडारकर, प्रवीण सूर्यवंशी, प्रा.दीपक पाटील यांनी केले.
अनघा मोदक यांचा थोडा परिचय
नाव - अनघा प्रदीप मोडक
जन्म तारीख - १७ मे १९८९
शिक्षण - पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या यात पदव्युत्तर पदवी संपादित. पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांकाने व महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने संज्ञापन व पत्रकारितेत पदविका संपादित, मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात कला शाखेतून पदवी संपादित, गांधर्व महाविद्यालयातून गायनाच्या तीन परिक्षा उत्तीर्ण.
अस्मिता चित्र अकॅडेमीमधून नाट्यशास्त्राची पदविका संपादित.
छायाचित्रण कलेत पदविका संपादित.
भाषा ज्ञान - मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती
प्रमुख कार्यक्षेत्रे -
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर ' माझा संघर्ष आणि मी' या कार्यक्रमाची मुलाखतकार म्हणून कार्यरत होते.
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या १००.१ FM Gold वाहिनीवर रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत.
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीच्या अनेक श्राव्य मालिकांसाठी आवाज आणि नाट्य अभिवाचन.
अनेकविध नामांकित संस्थांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच नामांकित सांस्कृतिक प्रतिष्ठानांनी आयोजित केलेल्या मैफिलींचे निवेदन.
विविध संस्थांसाठी त्यांच्या अपेक्षेनुरुप संकल्पनांचे आरेखन, निर्मिती व संहिता लेखन.
शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्थांसाठी आवाज कला व आवाज शास्त्र यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत.