सावंतवाडी : परप्रांतीय कामगारांमध्ये मारहाण झाल्याची घटना आज सकाळी शहरात घडली. यामध्ये सौरभ सिंग देवेंद्र सिंग (वय 22, सध्या राहणार भटवाडी रा.बिहार ) हा परप्रांतीय युवक किरकोळ जखमी झाला असून पोलीस ठाण्यात एकूण तिघांविरोधात महाराणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ सिंह हा शनिवारी सकाळी आठ वाजता शहरातील गवळी तिठा परिसरातून पायी चालत जात असताना बच्चनलाल प्रसाद, विजय खाटीग, कल्लू तसेच अनोळखी तीन ते चार इसमानी हाताच्या थापटाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यातील बच्चनलाल प्रसाद याने माझ्याकडे कामाला का येत नाही अशी विचारणा केली. यामधून हा प्रकार घडला. यामध्ये सौरभ सिंग याच्या कमरेला, पाठीला व उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. याबाबत सिंग यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. झालेल्या घटनेची तक्रार दिली. यावरून चौघांविरोधात पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोहकरे करत आहे.