राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 16, 2025 15:58 PM
views 128  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी समुद्र किनाऱ्यांच निवड करण्यात आली आहे. ही मोहिम माहे सप्टेंबर 2025 च्या तिसऱ्या शनिवारी (आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन) 20 सप्टेंबर 2025 रोजी करण्याचे नियोजित आहे. या मोहिमेंतर्गत देवगड तालुक्यातील मिठमुंबरी व मालवण तालुक्यातील आचरा व देवबाग या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. 

पर्यटनदृष्ट्या स्वच्छता मोहिम ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सागरी किनारे येथे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये संबंधित गटविकास अधिकारी यांनी नगरपालिका, नगरपंचायत विभागांच्या सहकार्याने संबंधित ग्रामपंचायत, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विभाग तसेच सामाजिक संस्था तसेच स्थानिक लोकसहभगातून स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी सा.प्र बालाजी शेवाळे यांनी केले आहे.