गुणवंत विद्यार्थ्यांचा बीसीएतर्फे सन्मान !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 31, 2023 20:46 PM
views 183  views

सावंतवाडी : मास्टर ऑफ कंम्प्युटर अॅप्लिकेशनच्या सीईटी परिक्षेत वुमेन्स बीसीए / एमसीए कॉलेज सावंतवाडीच्या TYBCA २०२२-२३ च्या स्नेहा राऊळ ८८.९० टक्के व सायली दळवी ७६.६१ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत, ज्येष्ठ सल्लागार काका मांजरेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या दोन्ही विद्यार्थ्यीनींनी महिला महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी संस्थेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत, ज्येष्ठ सल्लागार काका मांजरेकर, प्राचार्या सौ. पाटील, प्रा. ठाकर आदी उपस्थित होते.