
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत मेजर खेमसावंत (पंचम) तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८७ वी पुण्यतिथी समारंभ गुरुवार ४ जुलै रोजी सकाळी १० वा. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा होणार आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजेसाहेब राजाबहादूर श्रीमंत खेमसावंत भोंसले, राणीसाहेब चेअरमन शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थितीत रहाणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे या 'शैक्षणिक परिवर्तन काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या समारंभास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने प्राचार्य डॉ. डी. एल.भारमल यांनी केले आहे.