ग्रामस्वच्छता अभियानात बापर्डेचा राज्यात डंका

नाशिक येथे ५ मार्चला होणार पुरस्कार वितरण
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 26, 2024 14:42 PM
views 67  views


          


देवगड


संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात  बापर्डे ग्रामपंचायत राज्यात  स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहे .

        बहुप्रतिक्षित असा या स्पधेचा निकाल नुकताच शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे .सन २०१९- २० मध्ये बापर्डेचा राज्यात पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे .

        बापर्डे ग्रामपंचायतीने आतापर्यत विविध अभियानात यश मिळवले आहे . निर्मल ग्राम पुरस्कार , स्मार्ट ग्राम पुरस्कार , असे विविध पुरस्कार ISO मानांकन प्राप्त बापर्डे गावाने स्वच्छतेमध्ये सातत्यपुर्ण व नाविन्यपुर्ण  उपक्रम राबविलेले आहेत . या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आता पर्यत राज्यातीत जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायतींनी  भेटी दिलेल्या आहेत .

        या यशात गावातील प्रत्येक  घटकाचा असलेला सांघिक प्रयत्न महत्वाचे असल्याचे प्रतिपादन बापर्डे सरपंच संजय लाड यांनी व्यक्त केले . तसेच अभियान काळात आमदार मा, श्री,नितेशजी राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन व डॉ सुहास राणे याचे सहकार्य तसेच तात्कालिन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर , उपमुख्यकार्यकारी अधिकारी  पाणी व स्वच्छता विभाग विनायक ठाकुर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे ,तसेच देवगड पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा परिषद  पाणी व स्वच्छता कक्षाचे संपुर्ण टीम , तसेच जिल्हा समन्वयक संतोष पाटील , प्रविण काणकेकर , मनिष पडते , विस्तार अधिकारी निलेश जगताप , विस्तार अधिकारी अंकुश जंगले  तसेच बापर्डे ग्रामसेवक शिवराज राठोड यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले तसेच बापर्डे गावामध्ये भजनाच्या माध्यमातून स्वच्छतेची महती गावागावात पोहचवणारे भजनी बुवा संदीप नाईकधुरे यांचाही सन्मान राज्य शासनाद्वारे  होणार आहे . या यशाबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख तसेच गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी बापर्डे गावाच अभिनंदन केल .

        राज्यात पुरस्कार प्राप्त बापर्डेस पुरस्कार सन्मान  दिनांक ५ मार्चला नाशिक येथे  पाणी व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे .