निकालापूर्वीच विजयाचे बॅनर

Edited by:
Published on: November 22, 2024 10:24 AM
views 858  views

कुडाळ : निवडणूक निकालापूर्वीच महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक पार पडली. यावेळी कुडाळ – मालवण मतदार संघात महायुतीकडून निलेश राणे तर महाविकास आघाडीकडून वैभव नाईक हे निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतु निकाल लागण्यापूर्वीच निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.या बॅनरवर कुडाळ – मालवण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. निलेशजी राणेसाहेब आपणास प्रचंड विजयाच्या प्रचंड… प्रचंड… आणि प्रचंड शुभेच्छा असा उल्लेख करण्यात आला आहे. निकलापूर्वीच अशाप्रकारे विजयाच्या शुभेच्छा देणार बॅनर लागल्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.