
दोडामार्ग : दोडामार्ग सह बांदा परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. बांदा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठा पाऊस पडला. यावेळी रस्त्या लगतची झाडे वाऱ्यामुळे रस्त्यावर पडून बांदा दोडामार्ग काही वेळ बंद होता. स्थानिकांच्या सहकार्यामुळे झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अवकाळी पावसामुळे येथील काजू बागायदार शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.
दोडामार्ग गिरोडे, वझरे, आंबेली भेडशी, कळणे,आडाळी, मोरगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, उष्णतेने लाही लाही झालेल्या नागरिकांना सर्वत्र थंडा थंडा कुल कुल वातावरण पहावयास मिळाले. बांदा परिसरात साधारण २ तास बत्ती गुल झाली होती. बांदा दोडामार्ग मार्गावर आडाळी व पानवळ यां ठिकाणी चिखल माती साचल्याने वाहन चालकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.