
कणकवली : भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्यपदी कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र श्री. हर्णे यांना देत त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
बंडू हर्णे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या पक्षांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची वाटचाल केली आहे. शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असून, कणकवलीत रस्त्यांचे जाळे तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कणकवली चे गडकरी अशी त्यांची अनेकदा ओळख सांगितली जाते. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.