बांद्रा-मडगाव रेल्वेचं सावंतवाडीत जंगी स्वागत

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश!
Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2024 04:42 AM
views 825  views

सावंतवाडी : रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीच सावंतवाडीत जंगी स्वागत केले. 

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ही गाडी बोरिवली - वसई सावंतवाडी अशी सुरू करावी यासाठी प्रयत्न केले होते. रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. कोरोनाकाळात सावंतवाडीतील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे थांबे काढून घेतल्याने मोठी गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन, उपोषण करून प्रशासनाला जाग आणली. यानंतर रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली. त्या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी थांबा देण्यात आला आहे. दि.३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीच सावंतवाडीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, सल्लागार महेश परुळेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, राज पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, संघटनेच्या लढ्याला आज खूप मोठं यश मिळालं आहे. बोरीवली-सावंतवाडी, ब्रांदा ते मडगाव गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळाला आहे. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानतो असे मत सचिव‌ मिहीर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच येणारा काळ सावंतवाडी टर्मिनससाठी निश्चितच चांगला असेल, कोकणवासियांचा प्रवास निश्चितच सुखकारक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.