
बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज बांदा शहर तसेच परिसरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती प्रमोद कामत, माजी सभापती शितल राऊळ, उपसरपंच आबा धारगळकर, माजी उपसरपंच राजाराम सावंत, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, साई धारगळकर, निलेश कदम, गुरु सावंत, साई सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस, डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच प्रवीण देसाई, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दळवी यांनी बांदा शहर, डेगवे येथे भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले.