
बांदा : २६ जुलै २०२५ च्या रात्री बांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते कट्टा परिसरातून काही भटके कुत्रे अचानक बेपत्ता झाले आहेत. काही अज्ञात व्यक्तींकडून ह्या कुत्र्यांना अन्नावाटे विशबाधा अथवा गुंगी देउन दूरवर सोडण्यात आले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. या बाबतची तक्रार बांदा पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. भटके कुत्रे नाहीसे कसे झाले या मागे कोणत्या व्यक्तीचा हात आहे व त्या मागे त्यांचा हेतू काय आहे हे स्पष्ठ होणे गरजेचे आहे. यासाठी ही तक्रार काही प्राणी प्रेमींनी केली आहे. कारण कदाचित त्यांना मारण्याच्या हेतूने किंवा जागा बदलण्याच्या हेतूने हे काम झाले असावे किंवा या कुत्र्यांना पकडून काही रेस्टॉरंट्स ना मटण विक्री साठी तस्करी झाल्याचा संशय प्राणी प्रेमींकडून व्यक्त होत असल्याने याचा लवकर तपास करून यामागे असणाऱ्या नराधमाला कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यामध्ये काही प्राणी कल्याण संस्थानी सुध्दा आपला सहभाग दर्शवला आहे.
Prevention of cruelity to Animals Act 1960 :
जनावरांची जागा बदलणे हा एक दंडनीय गुन्हा आहे आणि त्या व्यक्ती किंवा गटावर भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ३४, २६८ आणि कलम ५११ सह ४२९ वाचले जाऊ शकते तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ३, ११(१)(अ), (i) आणि ३८(३) अंतर्गत भटक्या कुत्र्यांना विस्थापित/स्थलांतरित करणे किंवा त्यांच्या जागेपासून दूर करणे यासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये त्या व्यक्तीवर किंवा गटावर 5 वर्षांपर्यंत अ जामीन पात्र किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
या नराधमांना कडक शिक्षा होण्यासाठी युध्द पातळीवर काम चालू आहे. यासाठी काही प्राणी कल्याण संस्था आणि प्राणी मित्र एकत्र येत आहेत. काही प्राणी कल्याण संस्थांच्या प्रयत्नाने हा विषय दिल्ली पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे.